Ahmednagar News: ‘शरद पवार गो बॅक’, पवारांच्या पारनेर दौऱ्याला स्थानिक संघटनांचा विरोध; पोलिसांची मध्यस्थी यशस्वी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार गो बॅक म्हणत या दौऱ्यांला विरोध केला जात आहे.

शरद पवार यांच्या या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला होता. समितीकडून कारखान्याच्या विक्रीत पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता. कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर रात्री जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार-गो बॅक’ असे लिहून आपली नाराजी कारखाना बचाव समितीने व्यक्त केली आहे. या आंदोलनाला भुमिपूत्र शेतकरी संघटना, भीम आर्मी , अन्याय निर्मुलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी देखील पाठींबा दिला आहे.

मात्र पोलिस प्रशासनाने कार्यक्रमाचे आयोजक व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कारखाना बचाव समितीने केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *