Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price on 10 March 2023: सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचा १० ग्रॅम सोन्याचा दर - Maharashtra 24

Gold-Silver Price on 10 March 2023: सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचा १० ग्रॅम सोन्याचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५०,९०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५१,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६५,४५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६५,५५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,५३० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५०,९०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५,५३० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,५३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,९३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६५४.५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *