सभागृहात आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

फडणवीसांनी काल मांडला अर्थसंकल्प

पंचामृत ध्येयावर आधारित एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांना अर्ध्या तिकिटांत एसटीचा प्रवास आणि राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार अशा घोषणांची आतिषबाजी केली. महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. हे पाहता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा षटकार ठोकला आहे.

अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा!, विरोधकांची टीका

काल सादर झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकलपवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरले..फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजर हलवा’, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर वास्तवाचा भान नसलेला अर्थसंकल्प असून हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

राज्यातील कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण उत्पादक शेतकरी संकटात आहे. 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे वाया गेली आहेत. त्यांनातत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *