महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – नोटाबंदीमुळे नोटाबंदीचे उद्दीष्ट सफल झाले की नाही हा विषय बाजुला ठेवू या पण आज देशाच्या अर्थ व्यवस्थेची जी दयनीय अवस्था आहे तिला काही प्रमाणात तरी खात्रीचा आधार देणारी जी ” पर्यायी अर्थव्यवस्था ” होती जी न दिसणारी-अदृश्य अशी की जिची नोंद कोठेही नसायची पण आर्थीक संकट समयी ती बरोबर उपयोगात यायची…….. ती म्हणजे ग्रामीण व निं शहरी भागातील महिला वर्ग व जेष्ठ नागरीक वर्ग जे आपल्या आर्थीक सुरक्षेसाठी भविष्यात आर्थीक अडचणीत उपयोगी पडावा म्हणून एक एक पै बचत करुन पैसा साठवून ठेवत असे ,
असा जो पैसा होता तो आर्थीक संकट वेळी उपयोगी पडत होता. तो पैसा नोटा बंदी मुळे संपुर्ण संपला आहे. भारतीय महिला दर महिन्याला घर खर्चा साठी मिळालेल्या रक्कमेतून काटकसर करुन थोडीशी रक्कम बाजुला टाकत असते, जी रक्कम कुटुंबात कोणालाच माहीत नसायची कारण की तीचा ऊद्देशच अडचणीत उपयोगी पडण्यासाठी असायचा, काही महिलांचे पती व्यसनी असतात त्यामुळे ते पोरा बाळांच्या दवाखाण्यासाठी व शिक्षणासाठी बचत करुन बाजुला ठेवत असे तो पैसा नोटाबंदीमुळे बाहेर आला व तेव्हाच संपला तसेच जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही झाले आहे,
आपल्या मुलापासुन व सुनांपासून लपवलेला पैसा बाहेर आला व तेंव्हाच संपला नाहीतर आता तोच पैसा खर्चायला कामी आला असता व कोलमळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी उपयोगी पडला असता. अजुन एक महत्वाचा मुद्दा आहे की ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्था अजुनही पुर्णपणे कार्यरत नाही तसेच अजुन ही बँकिंग क्षेत्राचे बरयाच लोकांना ज्ञान नाही त्या मुळे बरीच मंडळी आपल्या भविष्याच्या आर्थीक सुरक्षे साठी पैसा घरातच रोख स्वरुपात ठेवत असे. नोटबंदी मुळे ती रक्कम सर्व बाहेर आली व खर्च झाली.
आपल्या देशाच्या एकुण लोकसंख्या 50 % लोकसंख्या आजही ग्रामीण व निमशहरी भागात राहते………..नोटबंदीचे परीणाम संपत नाहीत तोवर कोरोना आर्थिक संकट घेवून आला….. अशा प्रकारे देशाला आर्थीक संकट प्रसंगी उपयोगी पडणारी पर्यायी अर्थव्यवस्था नोटबंदी मुळे संपलेली आहे. परंतू खात्री आहे की ती “पर्यायी अर्थव्यवस्था ” पुन्हा ऊभी राहील सरकारने सुरू केलेल्या ” मनरेगा ” व ” रोजगार हमी योजना ” जी पुर्णपणे कोलमंडलेली आहे नोटबंदी मुळे::——— ……. पी.के. महाजन ..जेष्ठ कर सल्लागार.