महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । चांदणी चौकातील पुलाचे बांधकाम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असतील, तर पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी केले जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चांदणी चौकातील पुलामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. तेथे नवा पूल बांधण्याचा, रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा प्रकल्प राबविण्यात आला. तेथे काम सुरू असताना महामार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असे. मुख्यमंत्री शिंदे या कोंडीत अडकले होते. त्यांनी स्फोट करून पूल पाडण्याची सूचना केली. त्यानंतर 1 ऑक्टोबरला स्फोट करून पूल पाडण्यात आला. त्यानंतर त्यालगतच्या भागात पाषाण खोदून रस्तारुंदीकरणाचे काम करण्यात आले. त्याचवेळी पुलासाठी खांब उभारण्याचे काम सुरू केले. पुलाचे काम एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले.