Sameer Khakkar: नुक्कड मधील ‘खोपडी’ फेम समीर खाखर काळाच्या पडद्याआड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मार्च । प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कर आता आपल्यात राहिले नाहीत. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर 80 च्या दशकात दूरदर्शनच्या लोकप्रिय मालिका नुक्कड (1986) मध्ये ‘खोपडी’ या मद्यपीची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जात होते. समीर खक्कडचे भाऊ गणेश खक्कड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना समीर यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

समीर खक्करचे भाऊ गणेश खक्कर यांनी अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती.

काल दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे ४.३० वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. बोरिवलीतील बाभाई नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

समीर खक्कर हे मुंबईच्या बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये एकटेच राहत होते. समीर खक्कर यांची पत्नी अमेरिकेत राहते. समीर यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव सकाळी १० वाजता जवळच्या स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फर्जी’ या मालिकेत ते अखेरचे दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *