चिंताजनक ; पुण्यात दिवसेदिवस कोरोनाग्रस्तांची भर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – लक्ष्मण रोकडे – पुणे शहरात दाट लोकवस्ती असलेल्या भागात, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आता पिंपरी-चिंचवडमधीलही झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी 36 कोरोनाग्रस्तांची भर पडली. त्यातील 25 रुग्ण चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीतील असून, येथील एकूण रुग्णांची संख्या 170 झाली आहे. तर महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 457 वर पोहोचली आहे. चर्‍होली येथील तीन रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात आठवडाभरापासून 200 ते 300च्या घरात कोरोनाग्रस्त अढळून येत असून, एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 480 झाली आहे. मंगळवारी शहरात 255 कोरोनाग्रस्त आढळून आले, तर नऊ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. चिंचवड रेल्वे स्थानकालगतच्या आनंदनगर झोपडपट्टीत 25 जणांना कोरोनाची लागण झाली, तर पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 36 रुग्णांची भर पडली आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या 457 झाली आहे. दोन्ही शहरांतील विविध रुग्णालयांत उपचार घेऊन कोरोनामुक्‍त झालेल्या 160 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 2 हजार 279 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यापैकी 176 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 140 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 875 एवढी झाली आहे. मंगळवारी नऊ रुग्ण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या 273 झाली आहे. पुणे शहरात मंगळवारी तब्बल दोन हजार 44 नागरिकांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 43 हजार 907 संशयित नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यात पाच हजार 427 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *