Aadhar Card Update : आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता ……

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । Aadhar Card Update : आधार कार्ड ही सध्या काळाची गरज झाली आहे. अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणूनही याचा वापर केला जातो. बँक खात्यापासून (Bank Account) ते गॅस सिलिंडरपर्यंत आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड (Aadhar Card) महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहा वर्ष जुने आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) करण्याची मोहिम केंद्राने हाती घेतली असून यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ट्विट करून माहिती दिली आहे.

तुम्ही जर आधार कार्ड काढून 10 वर्षाचा कालावधी लोटला असेल तर ते अद्ययावत अर्थात अपडेट करण्याचे आवाहन UIDAI ने केले आहे. नागरिकांना आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, फोटो आणि बायोमॅट्रोत डाटा अद्ययावत करावा लागणार आहे. यासाठी आधार कार्ड वापरकर्ता myaadhaar पोर्टलचाही वापर करू शकता किंवा जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करू शकता. मात्र myaadhaar पोर्टवर अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. परंतु आधार केंद्रावर जाऊन अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागतील. ही सुविधा 15 मार्चपासून सुरू झाली असून 14 जूनपर्यंत मर्यादित असणार आहे.

https://twitter.com/UIDAI/status/1636012743906959364?s=20

UIDAI ने आधार धारकांना आवाहन केले आहे की, MyAadhaar पोर्टलला भेट देऊन दस्तऐवज अपडेट सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकतात. कागदपत्रे अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परंतु आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रे अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. यापूर्वी, आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी आधार कार्ड वापरकर्त्यांना 25 रुपये द्यावे लागत होते.

ऑनलाईन आधार कार्ड अपडेट कसे कराल?
सर्वात पहिले UIDI च्या myaadhar पोर्टल myaadhaar.uidai.gov.in वर जा. त्यानंतर आधार लॉगइन करण्यासाठी Login बटनावर क्लिक करा.
यानंतर तुमचा आधार नंबर टाका व दिलेला कॅपचा टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP वर क्लीक करून OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे व Login करा.
त्यानंतर Next Page वर थोडे खाली स्क्रोल करून Documents Update असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा आहे व पुढच्या पेज वर Next वर क्लिक करायचे आहे.
तुम्हाला आधार डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे याची माहिती दिसेल, त्याखाली असलेल्या Next बटन वर क्लिक करायचे आहे.
आता आधार कार्डवर असलेली तुमची वैयक्तिक माहिती दाखवली जाईल. ती माहिती एकदा चेक करून घ्या आणि पुढे जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तेव्हा त्या डॉक्युमेंटवरची माहिती आणि ही आधार कार्ड वरील माहिती अपडेट करा. (उदा. नावात बदल, पत्ता, जन्मतारीख..)
त्यानंतर माहिती बरोबर असेल तर I verify that above details are correct वर टिक करा.
शेवटी तुम्हाला दोन प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे, यामध्ये Proof of Identity (POI) / ओळखीचा पुरावा आणि Proof of Address (POA) / पत्त्याचा पुरावा असे डॉक्युमेंट अपलोड करा.
डॉक्युमेंट अपडेट करताना, डॉक्युमेंट हे 2MB पर्यंत असावे, फाइल JPEJ, PDF, PNG फॉरमॅट मधेच अपलोड करावी. तुमचे पॅन कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स अपलोड करू शकता. तुमच्या आधार कार्डवरील नाव, जन्म तारीख आहे त्याच नावाचे डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करायचे आहे.
Proof of Identity (POI) मध्ये बँक पासबुक, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, किसान फोटो पासबुक, विवाह प्रमाणपत्र, अपंग आयडी कार्ड/अपंग आरोग्य सर्टिफिकेट
Proof of Address (POA) – ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, लाईट बिल, गॅस कनेक्शन बिल, किसान फोटो पासबुक, विवाह प्रमाणपत्र, शाळेचे आयडी कार्ड…
आता डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खाली agree वर क्लिक करा Next बटन वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *