देशात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला : व्हायरसमुळे आतापर्यंत 9 मृत्यू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 4 H3N2 आणि 28 रुग्ण H1N1 चे आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राज्यात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत.

पुढे वाचण्यापूर्वी, आतापर्यंत व्हायरसशी संबंधित अपडेट्स…

गुजरातमधील वडोदरा येथे याच विषाणूमुळे 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दिल्लीच्या LNJP हॉस्पिटलमध्ये 20 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील नवीन प्रकरणे पाहता बेड आणि डॉक्टरांची सुविधा वाढविण्यात येत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पुद्दुचेरीतील सर्व शाळा 16 ते 26 मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बुधवारीही आसाममध्ये H3N2 विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *