Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, पुढील ५ वर्षात पेट्रोल-डिझेल…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । देशातील पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व आणि वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की लोकांनी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने किंवा फ्लेक्स इंधनावर चालणारी वाहने खरेदी करावीत.

येत्या 5 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवायचे आहे. एलएनजी, सीएनजी, बायोडिझेल, हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणारी वाहने लोकांनी वापरावीत, हे माझे उद्दिष्ट आहे, असे रस्ते आणि परिवहन मंत्री एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

येत्या 5 वर्षात देशातून पेट्रोल आणि डिझेलची गरज संपुष्टात आणण्यासाठी मी काम करत असून तुमच्या पाठिंब्याशिवाय ती पूर्ण करणे शक्य नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले. (Nitin Gadkari apeals people to buy electric vehicle said will end need of petrol diesel in next five years)

ई वाहनांसाठी लोक प्रतीक्षेत :
ते म्हणाले की काही काळापूर्वी लोक इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि आव्हानांबद्दल बोलत असत. पण आता काळ बदलला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ खुली झाली असून आता लोकांना त्यांची वाहने घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत राहावे लागत आहे.

यावेळी गडकरींनी लोकांना विनंती केली की, तुम्हीही वाहन खरेदी करत असाल तर पेट्रोल-डिझेल घेऊ नका. इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेली खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *