महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । या वर्षाचा ऑस्कर भारतासाठी खूपच खास होता. ऑस्कर २०२३ मध्ये भारताला दोन पुरस्कार मिळाले, त्यातील एक पुरस्कार नाटू नाटू गाण्यासाठी मिळाला होता. आपल्या गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता राम चरण भारतात परतला आहे. यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल भाष्य केले आहे. सोबतच त्याला एका खेळाडूच्या बायोपिकमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
राम चरणच्या RRR चित्रपटातील नाटू-नाटू हे गाणे सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये अभिनेता त्याच्या आवडत्या स्टार सलमान खानबद्दल बोलला. तसेच आपण दबंग खानचा चाहता असल्याची कबुली दिली आहे.
सलमानसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल रामचरण म्हणतो, “मी मुंबईत असताना मला भाईजानने भेटीसाठी बोलवलं होतं. त्याचा तो भेटीचा किस्सा मी कधीच विसरणार नाही. त्यावेळी सलमानने माझे आदराने स्वागत केले होते.”
राम चरणला तुला अशी कोणाची भूमिका आहे, ती करायला आवडेल, तेव्हा अभिनेत्याने खुलासा केला की, मला एका क्रिकेट खेळाडूवर बायोपिक करायला खूप आवडेल, मी त्या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे. मोठ्या पडद्यावर मला विराट कोहलीची भूमिका साकारायला आवडेल. माझ्या अंदाजे, मला चान्स मिळाला तर मी नक्कीच संधीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल.
त्याचवेळी मीडियाशी बोलताना राम चरण म्हणतो, “मी खूप आनंदी आहे. सर्वांचे आभार. एमएम कीरावानी, एसएस राजामौली आणि चंद्र बोस यांचा मला अभिमान आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळाली आणि आम्ही ऑस्कर भारतात आणू शकलो. भारतात सर्वांनीच हा चित्रपट पाहिला. चित्रपटाला आणि ‘नाटू- नाटू’ गाण्याला प्रसिद्धी झोतात आणल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे मनापासून आभार. ‘नाटू- नाटू’ हे गाणे आमचेच नसून सर्व भारताचेच हे गाणे आहे.”