ऑस्कर सोहळ्यात राजामौलींना प्रत्येक तिकिटासाठी मोजावी लागली ‘इतकी’ रक्कम

 36 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च । ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एस एस राजामौली आणि त्यांचे कुटुंबीय, याशिवाय ‘नाटू नाटू’चे गीतकार चंद्रा बोस, संगीतकार एम. एम. कीरावानी, साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, त्याची पत्नी आणि राम चरण त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. पण या सर्वांना ऑस्कर एंट्री मोफत नव्हती. ऑस्कर २०२३ मध्ये प्रत्येक सीट मिळवण्यासाठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजामौली यांना लाखो रुपये मोजावे लागले आहेत.

अकादमी पुरस्कारांनुसार, केवळ पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना कार्यक्रमाची मोफत तिकिटे मिळतात. तर नाटू नाटूला पुरस्कार दिला जाणार असल्याने ऑस्कर कार्यक्रमात केवळ चंद्रा बोस, एम.एम कीरावानी आणि त्यांच्या पत्नींनाच मोफत प्रवेश देण्यात आला. तर एस एस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत तिकीट नव्हतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार एसएस राजामौली यांनी प्रत्येक तिकिटासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले. ऑस्कर अवॉर्ड पाहण्यासाठी राजामौली यांना प्रत्येक तिकिटासाठी २५ हजार डॉलर्स म्हणजे प्रत्येक तिकीटासाठी सुमारे २० लाख मोजावे लागले आहेत. आता हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *