उद्धव ठाकरेंनी बोलवली महाविकास आघाडीच्या मंत्र्याची महत्त्वपूर्ण बैठक :लॉकडाऊन संपल्यानंतर काय असेल सरकारचा प्लॅन?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – राज्यात कोरोना विषाणू रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः मुंबई, पुणे शहरांमध्ये रेड झोन भागांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या रेड झोन एरियामध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर खबरदारीच्या दृष्टिकोनातून नवीन नियमावली कोणत्या स्वरूपात करता येईल, तसेच सध्याच्या नियमात कोणते बदल करून काही भागांमध्ये रिलॅक्सेशन देता येईल, या उद्देशानं महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीमधील मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत.

लॉकडाऊन संपल्यानंतर हॉटस्पॉट एरिया कोणत्या नवीन नियमावली करणार यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हाचा आढावा घेण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा मुळात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता तसेच आरोग्य नगर विकास ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण या विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सकाळी 11 च्यादरम्यान ही बैठक सुरू होणार असून बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होती, असं सांगितलं जात आहे. राज्यात चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर नवीन नियमावली करत असताना रेड झोन भागांमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन द्या व अशा स्वरूपाची भूमिका महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे. मात्र, मुंबई आणि पुणे शहरांमध्ये रिलॅक्सेशन देण्याबाबत मुख्यमंत्री फारसे अनुकूल नाहीत, असं समजतं. यावर देखील आज काही चर्चा होण्याची शक्यता आहे.


औद्योगिक क्षेत्र तसेच शैक्षणिक काळात कोणत्या स्वरूपाचे पुढील काळातील धोरण ठरविण्याबाबत देखील या वेळेस चर्चा होईल असं सांगितलं जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *