महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संजीवकुमार गायकवाड – विशेष प्रतिनिधी – नांदेड : सध्या कोरोना महामारीने देशात व राज्यत थेमान घातले असताना राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असल्यामुळे विविध कामा साठी आलेला निधी इतरस्त वळविण्याच्या शासन स्तरावरील हालचाली वेगआला असताना गेली अनेक दीड वर्षा पासून विरोधी पक्षातील पदाधिकारी यांच्या तक्रारी मुळे दलितवस्तीचा निधी अडकून पडला होता पण जिल्याची जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंगाराणी अबुलगेकर यांनी हा निधी इतरस्त न जाऊ देता खेचून आणला.
दलित वस्तीच्याकामना मुहूर्त मिळून दिला आहे.यामध्ये 51कोटी 51लाख 83हजारांची कामे मजूर करण्यात आली आहेत या निधी तुन ग्रामपंचायतअंतर्गत मलनिसर ण, पाणीपुरवठा, रस्ते,नाली, समाजमंदिर दुरुस्ती व विदूतीकरना ची कामे करण्यात येणार आहेत असे जिल्हापरिषद अध्येक्ष सौ. मंगारानी अंबुलगेकर यांनी आमच्या प्रतिनिधीस अशा प्रकारची माहिती दिली आहे. त्यामुळे जिल्यातील दलित वस्तीचा काही प्रमाणात काया पालट होणार आहे.