Horoscope Today दि . २६ मार्च ; या राशीच्या लोकांना दिवस लाभदायक ; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ मार्च ।

मेष:-
आज दिवस दगदगीत जाईल. थोडा वेगळा विचार करून पहावा. औद्योगिक स्थिरता सांभाळावी. कामात काही बदल करून पहावा लागेल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.

वृषभ:-
आज अधिकारी वर्गाची भेट घ्यावी लागेल. रेस, जुगार यांची आवड पूर्ण कराल. दिवस खेळकरपणात घालवाल. मनाजोगी खरेदी करता येईल. सर्वांना आपलेसे कराल.

मिथुन:-
आज कौटुंबिक कामात गढून जाल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. उत्तम निद्रासौख्य मिळेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:-
आज चारचौघात कौतुक केले जाईल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. तुमची अरसिकता दूर सारावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-
आज कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

कन्या:-
आज इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप पडेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. मुलांच्या मताचा विचार करावा. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

तूळ:-
आज मनाची चंचलता वाढेल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. पित्त विकार बळावू शकतात. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्यात सुधारणा होईल.

वृश्चिक:-
आज हातातील अधिकार वापरावेत. जोडीदाराचे कौतुक कराल. मैत्रीची घनिष्टता वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. भागीदारीतून उत्तम लाभ मिळेल.

धनू:-
आज बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

मकर:-
आज सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. उष्णतेचे विकार वाढू शकतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळा.

कुंभ:-
आज सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. बागकामात मन रमेल. अचानक धनलाभ संभवतो.

मीन:-
आज बौद्धिक कौशल्य दाखवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद संभवतात. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. मनमोकळ्या गप्पा माराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *