Gudi Padwa च्या मुहूर्तावर वर्षातील पहिला हापूस आंबा विकत घेत आहात, अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च ।गुढीपाडवा (Gudi Padwa 2023)अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हिंदू लोकांचं नवीन वर्ष (Hindu New Year 2023)…त्यामुळे नवं वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. श्रीखंड पुरीसोबत (Shrikhand Puri) अनेक घरांमध्ये पुरण पोळी केली जाते. तर मुंबई आणि कोकणात हापूस आंबाची पहिली पेटी घरी येते. 

उन्हाळा म्हटलं की, हापूस आंबावर (Alphonso Mango) मस्त पैकी ताव…फळांचा राजा आंब्याची (Hapus Mango) गोडची काही औरच असते आणि त्यात हापूस म्हटलं की राव विषय संपला. पण गेल्या काही वर्षांमध्ये हापूसच्या नावावर डुप्लिकेट हापूस मार्केटमध्ये आला आहे. या हापूसच्या (Mango Market) नावावर ग्राहकांची फसवणूक केली जाते. चवीसोबतच आर्थिक फटका ग्राहकांना बसतो. मग अशावेळी अस्सल हापूस आंबा ओळखायचा कसा? जर तुम्ही हापूस खरेदी करणार असाल तर या काही टॅक्ट्स नक्की लक्षात ठेवा. (mango price in mumbai)

कसा ओळखावा अस्सल हापूस?
हापूसचा देठ खोल असतो.
हापूस कापल्यावर आतून केशरी रंगाचा असतो.
हापूसची साल पातळ असते.
त्याचा सुंगध हा वेगळा असतो.
त्याचा बॉटलग्रीन कलर असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *