सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. आताच याबाबत सरकारी कर्मचारी संघ सुकाणू समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्टोक्ती दिली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

शासनाने सकारात्मक भूमिका घेतली

संघटनेचे नेते विश्वास काटकर म्हणाले, आमची मुळ मागणी जुनी पेन्शन योजनेची मागणी होती. शासनाने यासंबंधी वेगवेगळी कार्यवाही केली त्यानंतर आज शासनाने स्पष्ट केले की, यासंदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत. त्यात समिती स्थापन केली जाईल. जुनी पेन्शन योजनेबाबतची भूमिका आम्ही स्वीकारली आहे असेही संघटनेते नेते विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले.

जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज माझ्या समवेत सरकारी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. त्यांनी सकारात्मक सहकार्य करीत संप मागे घेण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. जुूनी पेन्शन योजेनेबाबत एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून यावर उचित निर्णय घेण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *