7.40 लाख Views मिळालेला Video पाहिला का?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । ‘थांबला तो संपला!’ अशी एक म्हण असून जंगलामधील परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी ही म्हण अगदीच योग्य आहे. जंगलात वावरताना जरा जरी चूक झाली तर मृत्यू अटळ आहे हे शाश्वत सत्य आहे. त्यातही बिबट्या, चित्ता, वाघ, सिंह आणि मगरीसारख्या हिंसक प्राण्यांच्या तावडीत एखादा प्राणी सापडला तर त्याचा जीव वाचणं फारच कठीण असतं. हे सर्व प्राणी जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी मानले जातात. मात्र हे तगडे प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात उभे ठाकले तर काय होईल असा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर परिस्थितीनुसार वेगवेगळं देता येईल. याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांचा संघर्ष नुकताच व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

19 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल
मगर पाण्यात असताना तिच्याशी नादी लागणं म्हणं साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं असतं हे बिबट्या, चित्ता आणि सिंहासारख्या प्राण्यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र हाच उभयचर प्राणी पाण्याबाहेर असेल तर त्याचीही शिकार सहज होऊ शकते. असाच प्रकार एका मगरीबद्दल घडला. ट्विटवर शेअर करण्यात आलेल्या एका 19 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक चित्ता चक्क मगरीची शिकार करताना दिसत आहे. मगर नदीच्या किनाऱ्यावर उन्हात आराम करत असल्याचं दिसत आहे. याचवेळी एका चित्याची नजर या मगरीवर पडते. मगर पाण्याच्याबाहेर असतानाच हल्ला केला तर आपल्याला शिकारीची संधी आहे याची जाणीव झाल्यानंतर हा बिबट्या हळूच नदीच्या एका किनाऱ्यावरुन पाण्यामधून मगरीच्या मागे येतो.

…अन् चित्त्याचा हल्ला
पुढल्या क्षणी हा चित्ता मगरीवर हल्ला करतो. मगर हल्ला झाल्यानंतर या चित्त्याला पाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. मात्र चित्त्याच्या चपळतेपुढे मगरीचा निभाव लागत नाही. चित्ता मगरीच्या मानेजवळ चावा घेतो. त्यानंतर चित्ता या मगरीला तसाच जबड्यामध्ये पकडून जमीनीवर आपटतो. नंतर तो मगरीला तसाच पकडून पाण्यामधून दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जातो.

मगरीच्या शेपटानेच दिले संकेत
मुळात या बिबट्याने मगरीचा चावा घेताना तिच्या मानेजवळ हल्ला केल्याने मगर सुन्न होतं. बिबट्याच्या हल्ल्यानंतर मगर शेपटी हलवत नाही याकडे एकाने लक्ष वेधलं आहे. मगर सामान्यपणे संकटाच्यावेळी आपल्या शेपटीनेही शिकाऱ्यावर हल्ला करते. मात्र या व्हिडीओत मगर निपचित पडल्याचं आणि तिने पहिल्याच चाव्यानंतर संघर्ष सोडून दिल्याचं दिसतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *