Maharashtra Weather Bulletin :राज्यात पाऊस अजून किती दिवस ? हवामान खात्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस थैमान घालू लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान राज्यातील विदर्भामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने अंदाजही वर्तवला आहे.

दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगडपर्यंत विस्तारला आहे. यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

आज (ता. 21) विदर्भाच्या काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

पावसाची उघडीप, निरभ्र आकाश यामुळे राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मागच्या 24 तासांत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यतील उच्चांकी 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान झालेल्या पावसाने राज्याती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, केळी, द्राक्षे, डाळिंब या फळबागांसह राज्यातील कांदा उत्पादकांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *