महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मार्च । मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा राज्यभर साजरा होत आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंची सभा आहे. शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा आहे. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, याकडेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरे यांची ही सभा टर्निंग पॉइंट असेल, असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला होत असलेल्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली. सभेची जोरदार तयारी झाली आहे. ठाणे, पुणे, नाशिकमधून मनसे सैनिक आले आहेत. सर्वच जण राज ठाकरे यांच्या सभेची वाट पाहत आहेत. तर मनसे नेत्यांनीही राज साहेब, सत्य तेच बोलतात. ते कुणालाही सोडत नाही. राज ठाकरे यांची सभा ही टर्निंग पॉइंट ठरण्याचा दावा बाळा नांदगावकर यांनी केला.