पिंपरी चिंचवड मेट्रो वरून अजित पवार यांचा भाजपवर निशाणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । मुंबई, नागपूरच्या धर्तीवर पुण्याचाही विकास व्हावा. येथील वाहतूक व्यवस्था जलद आणि सुरळीत व्हावी यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली. ही सेवा पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरच सुरू झाली. त्यात अजूनही गती आलेली नाही. यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच या कामासाठी भाजपणे घाई केली असा टोला ही लगावला. तर पिंपरी चिंचवड मेट्रोचा प्रवाशांना उपयोग होत नाही. आता फक्त वाढदिवस साजरा करणे आणि शाळेच्या ट्रिपसाठी या मेट्रोचा उपयोग होतोय असा घणाघात त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *