Gold-Silver Price on 26 March 2023: सोन्याची चमक उतरली तर चांदी महागली ; पहा आजचे भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५४,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५५,०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७३,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८४० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,८४० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७३३ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *