AC घेताना त्याच मूल्यमापन टनात का केलं जातं ? पहा येथे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । उन्हाळा आला असून घरांमध्ये हळूहळू एसी ॲक्टिव्हेट होत आहे. आधीच झाकलेल्या वस्तूंचीही साफसफाई केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक चर्चा व्हायरल झाली. एका युजरने विचारले की, एसीमध्ये टन म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात लोक अनेक गोष्टी लिहित आहेत. चला तर मग जाणून घेऊया किती टन चा एसी आहे असं विचारलं जातं? इथे टन म्हणजे काय?

लोक जेव्हा एसी खरेदी करायला किंवा भाड्याने घ्यायला जातात तेव्हा दुकानदार आणि शोरूम त्यांना किती टन एसी लावायचा असा प्रश्न विचारतात हे खरं आहे. इथे टन नेमका काय आहे आणि ते कसं काम करतं याबद्दल बरेच लोक गोंधळून जातात. कुठल्याही एसीचा टन एका तासात एअर कंडिशनरमधून किती उष्णता उत्सर्जित होते हे सांगतो. खरं तर टन म्हणजे एसीची क्षमता.

मीडिया रिपोर्टनुसार, एसी जितका थंड होईल किंवा एसीची कूलिंग क्षमता किती असेल ही टनावर अवलंबून असते. एक टन एसी सहसा लहान बेडरूमसाठी सुचविला जातो, तर मोठ्या क्षेत्रफळाच्या खोलीसाठी अधिक टन आवश्यक आहे. त्याचबरोबर टन म्हणजे एसीचे एक युनिट एका दिवसात एक हजार किलो पाण्याचे बर्फात रूपांतर करते, असेही म्हटले जाते. सध्या सर्व उत्तरे सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी कोणत्याही एसीची क्षमता तशीच असल्याचे बोलले जात आहे. असो, आता उन्हाळ्याचा हंगाम आला आहे आणि याचे उत्तर तुमच्या कामी येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *