या अभिनेत्रीने हॉटेलमध्येच संपवलं जीवन, वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. ती 25 वर्षांची होती. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने आपला जीव घेतला. त्याठिकाणी ती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेली होती. आकांक्षा ही मूळची भदोही जनपदच्या चौरी ठाणा क्षेत्रातील परसीपूर इथली राहणारी होती. भोजपुरी इंडस्ट्रीतील ती प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने आत्महत्या का केली, यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *