Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; रविवारी आढळलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ मार्च । महाराष्ट्रात एकाच दिवशी 397 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 10,300 झाली आहे.

दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Pixabay)

नवीन प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात रविवारी 397 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या 437 होती.

एकट्या मुंबईत रविवारी 123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात 47 रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत आणि गेल्या 24 तासांत 56,551 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात रविवारी 397 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाल्याने एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 81,41,854 झाली आहे. तर मृतांची संख्या 1,48,435 वर स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *