Sri Lanka ODI WC: पावसामुळे श्रीलंकेच्या स्वप्नांना धक्का ! 2023च्या एकदिवसीय वर्ल्डकपमधून बाहेर ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मार्च । ODI World Cup qualification 2023 : श्रीलंकेच्या एकदिवसीय विश्वकरंडकात थेट पात्र होण्याच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा एकदिवसीय (ता. २८) सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळवण्यात आल्याने रद्द करण्यात आला, त्यामुळे श्रीलंकेच्या विश्वकरंडकात थेट पात्र होण्याच्या स्वप्नांना धक्का बसला आहे.

ख्राईस्टचर्चमधील आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना सुपर लीग स्पर्धेमध्ये प्रत्येकी पाच-पाच गुण देण्यात आले आहेत; मात्र याचा फटका श्रीलंकेच्या संघाला बसला आहे. त्यांना पाचच गुण मिळाले असल्याने ते ८२ गुणांसह नवव्या स्थानावर आहेत. भारतात होणाऱ्या विश्वकरंडकात थेट पात्रता मिळवण्यासाठी त्यांच्या हातात आता एकच सामना उरला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये होणार आहे. यात विजय संपादन करणे श्रीलंकेसाठी आवश्यक असणार आहे;

मात्र असे असले तरी विश्वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला आता दक्षिण आफ्रिकेच्या नेदरलँडविरुद्धच्या मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या नेदरलँडविरुद्धच्या दोन एकदिवसीय मालकेमध्ये २-० असा विजय मिळवल्यास ते सुपर लीगच्या गुणतक्त्यात आठव्या स्थानावर जाणार आहेत.

न्यूझीलंडचा संघ या सुपर लीगच्या गुणतक्त्यात १६५ गुणांसह प्रथम स्थानावर आहे. भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये थेट आठ संघ पात्र ठरणार आहेत. त्यापैकी पहिल्या सात संघांची नावे निश्चित झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *