प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षाचे होते. मृत्यूपूर्वी कोरोनाविषयी ‘ही’ वर्तविली होती भविष्यवाणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – गांधीनगर – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षाचे होते दारुवाला कोरोनाबाधित होते, अशी माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ते पॉझिटिव्ह नसल्याचा दावा केला. मात्र, अहमदाबाद महानगरपालिकेने जाहीर केलेल्या कोविड -१९ पॉझिटिव्ह रूग्णांच्या यादीमध्ये त्याचे नाव आहे.

दारूवाला यांचा ज्योतिषी शास्त्रावर मोठा अभ्यास होता. दरम्यान, बेजान दारूवाला यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही भविष्यवाणी वर्तविली होती. त्याची माहिती त्यांचे पुत्र नस्तूर दारुवाला यांनी दिली आहे. ”ते लढवय्ये होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी धैर्याने लढा दिला. कोरोना व्हायरस लवकरच देशातून निघून जाईल. दारिद्र्य आणि बेरोजगारी असूनही भारत फिनिक्सप्रमाणे भरारी घेईल. पुढील वर्ष हे भारतासाठी खूप चांगले वर्ष ठरेल आणि देश लवकरच महासत्ता म्हणून उदयास येईल,” अशी भविष्यवाणी बेजान दारुवाला यांनी वर्तविली होती असे नस्तूर दारूवाला यांनी सांगितले.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात दारुवाला यांनी एक ऑनलाईन व्हिडिओ पोस्ट करत कोरोनाविषयी भाकित वर्तविले होते. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचे संकट कायम राहिल. २१ मे नंतर कोरोना निघून जाईल. मे नंतर जगातील जनजीवन पूवर्वत होऊ शकते, असे दारुवाला यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *