महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ एप्रिल । निगडी – निगडी-यमुनानगर कॉर्नर येथील भोसरी बस स्टॉप यमुनानगर कॉर्नर येथून मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्किंग मध्ये बीआरटी बस स्टॉप या ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पी एम पी एल मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे..
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यमुनानगर कॉर्नर येथे रस्त्यावर पीएमपीएल बस उभ्या करून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रिक्षा चालक या ठिकाणी निगडी, भोसरी अवैध प्रवासी वाहतूक करत आहे. पीएमपीएल बस ठिकाणी लोखंडी बस शेड उपलब्ध नाही. दोन्ही बाजूला लोखंडी शेड शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना उपलब्ध करून देण्यात आले नाही. निगडी येथील यमुनानगर कॉर्नर येथील भोसरी बस स्टॉप मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्किंगमध्ये हलविण्यात यावा, असे ही निवेदनात म्हटले आहे.