राज्यात येलो अलर्ट: 6 ते 8 एप्रिलपर्यंत पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल ।आसाम व ओडीशा किनारपट्टी जवळ वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने देशातील बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज हवमाना विभागाने दिला आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील बुहतांश भागात हलका पाऊस झाला. ही परिस्थिती 8 एप्रिलपर्यंत राहिल.

तामिळनाडू ते ओडीशापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी जवळ जोरदार चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे वाढलेले तापमान पुन्हा कमी झाले. हिमालयासह मैदानी भागात आगामी 24 ते 48 तासांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होईल. पुढील 24 तासांत पूर्व अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य आसाममध्ये गारपीट होईल. मध्य भारतात पुढील पाच दिवसांत विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलका पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता आहे.

राज्यात येलो अलर्ट..
कोणात 6 एप्रिल तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 8 एप्रिलपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.कोकणात सहा, तर उर्वरित राज्याला आठ एप्रिलपर्यंत येलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *