Gold-Silver Price on 5 April 2023: सोन्याच्या किमती विक्रमी स्थरावर ; १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५५,३०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५४,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३३० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,३०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३३० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७४६ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *