Gautami Patil: व्हायरल झालेल्या ‘त्या’ विकृत घटनेनंतर गौतमी पाटील म्हणते आता मी..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ एप्रिल । ‘सबसे कातील गौतमी पाटील’ ही नाव अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर या सर्वांना आता माहिती झालं आहे. अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गौतमी पाटीलला या प्रसिद्धीचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वेग-वेगळ्या कारणाने गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या घृणास्पद घटनेने गौतमीसह अनेकांना धक्काच बसला. आता या विकृत घटनेनंतर तिच्यावर व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची वेळ आली आहे. गौतमीचे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. याआधी पडद्याआडदेखील कपडे बदलून ती कार्यक्रमाला उभी राहत होती. पण त्या व्हायरल झालेल्या विकृत घटनेने तिला खडबडून जाग केलं आणि तिने कार्यक्रमाला आता व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली आहे.

त्याचबरोबर कार्यक्रमात आता बाउन्सर देखील तिच्या व्हॅन भोवती दिसू लागलेत. आता गौतमी कार्यक्रमासाठी होकार देण्यापूर्वी व्हॅनिटीची व्यवस्था करण्याची मागणी करू लागली आहे. तसेच ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी किमान कपडे बदलण्यासाठी चार भिंतीची बंदिस्त खोली तरी द्यावी असं गौतमी सांगते. त्या विकृत घटनेनंतर आता गौतमी सावरली असून सावध देखील झाल्याचं दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *