Shivsena: आनंद दिघेंचं झालं, तेच रोशनी शिंदेंचं होण्याची भीती, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ एप्रिल । रोशनी शिंदे यांच्या पोस्टवरून वाद निर्माण झालेला असतानाच आता शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी रोशनी शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हंटलं आहे. उद्धव ठाकरेंनी धर्मवीर आनंद दिघेंची भेट घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्याची पुनरावृत्ती रोशनी शिंदेंच्या बाबतीत होऊ शकते अशी भीती मिनाक्षी शिंदेंनी व्यक्त केली आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “ज्यावेळी आनंद दिघेसाहेब अॅडमिट होते. तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी येऊन गेले. भेटून बाहेर आले त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याबाबत ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याचा खुलासा व्हायला पाहिजे. त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्यांच्याबरोबर काय झाला नक्की कोणाला माहित नाही” असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हंटलं आहे.

ठाणेकरांच्या मनामध्ये संशय आहे, असं मीनाक्षी शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे. रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरे गटाकडूनच धोका आहे. रोशनी शिंदेला संरक्षण मिळावं, अशी मागणीही माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्राद्वारे केलेली आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या उल्लेखही त्यांनी या पत्रामध्ये केला आहे.

रोशनी शिंदे प्रकरणात ठाकरे गटाकडून तिच्या जीवाला भीती आहे, अशी शक्यता मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, ‘ उद्या कुठल्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारलं तर काही कळणार नाही. त्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शनची मागणी करतोय. तिथे मुख्यमंत्र्यांनी सिव्हिल सर्जन नेमावे, अशीही आमची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *