Goa Trip : गोवा ट्रिपवर खर्च नाही कमाई होईल… कशी? या आहेत टिप्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ एप्रिल । गोवा म्हटलं की आठवतो तो सुंदर समुद्र किनारा आणि निसर्गाची किमया. सगळ्यांनाच आयुष्यात एकदा तरी गोव्याला जायचं असतंच, आपल्या मित्रांसोबत मजा करायची असते. सगळ्यांची आपली एक वेगळी फॅंटसी असते. तुम्हीही गोव्याचा प्लॅन केला आहे का? किंवा करण्याच्या विचारात आहात का?

अशात एकच गोष्ट जी अडते आणि ती म्हणजे पैशांचे गणित. अर्थात घरच्यांची परवानगीही असतेच म्हणा पण ठिके, तेव्हढं मॅनेज करता येतं. पण पैशांच काय? गोव्यात राहणं आणि खाणं अजिबात स्वस्त नाही. पण तुम्ही या काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचे हे प्रश्न तर सुटतीलच पण सोबत थोडे पैसेही हाताशी येतील.

गोव्यात परदेशी संस्कृती अधिक पाळली जाते, त्यामुळे वर्षभर देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. इथलं आपलं राहणं आणि खाणं फुकटात करायचं आहे? शिवाय पैसेसुध्दा कमवायचे आहेत, यासाठी तुम्ही काही ठिकाणी वॉलेंटियर म्हणून काम करु शकतात.

गोव्यात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे

गोव्यात अशी अनेक रेस्टॉरंट्स किंवा वसतिगृहे आहेत जी दिवसभर काम करण्याच्या बदल्यात राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. हा पर्याय सोलो ट्रिपर्ससाठी सर्वोत्तम आहे. आपण इच्छित असल्यास पैसे देखील कमवू शकता. असे केल्याने, आपण सहलीचा आनंद घ्याल आणि पैशांची बचत देखील कराल. वॉलेंटियर म्हणून, तुम्ही बारटेंडिंग, रिसेप्शनिस्ट, हाऊसकीपिंग किंवा टूर गाइड बनू शकता.

गोव्यात जिथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि त्यातील एक म्हणजे पाली चुलो हॉस्टेल. गोवा ट्रिप दरम्यान या वसतिगृहात हाउसकीपिंग किंवा इतर कर्मचारी काम करुन तुम्ही पैसे कमवू शकता.

असे म्हणतात की येथे केवळ २-३ दिवसच नाही तर १५ दिवस सुद्धा काम करण्याची संधी आहे. इथे वर्किंगचा वेळ सुद्धा खूप कमी आहेत. त्यामुळे तुमच्यावर कामाचा भार पडणार नाही आणि तुम्ही फावल्या वेळेत समुद्रकिनाऱ्यावर मजा करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *