अजित पवार Not Reachable ; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांबाबत माध्यमांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सऱद पवार यांना प्रश्न विचारले. अजित पवार नॉट रिचेबल आहेत, असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ते माझ्या संपर्कात आहेत असं म्हणून तो विषच निकाली काढून टाकला. शुक्रवारी दुपारी अजित पवार अचानक गायब झाले, सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट रिचेबल; अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्या प्रसिद्ध करत असतानाच काही माध्यमांनी अजित पवार यांच्यासोबत 7 आमदारही असल्याच्या बातम्या दिल्या.

अजित पवार हे माध्यमांना सापडेनासे झाल्याने त्यांनी अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त दिले. ते सापडेनासे झाल्याने अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत असल्याच्या अफवा पसरवण्यास सुरुवात झाली. मात्र आज सकाळी अजित पवार यांनी पुण्यातील खराडी भागातील एका दागिन्यांच्या दुकानाला सपत्नीक भेट देत सगळ्या अफवांमधील हवा काढून घेतली. अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत असं पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी या पत्रकारांनाच उलटा प्रश्न विचारला की, “नॉट रिचेबल तुम्ही कोणत्या आधारावर आहे. तुम्ही म्हणाल की सुप्रिया सुळे नॉट रिचेबल. त्या घरात आहेत मात्र तुमच्या समोर नाहीयेत. म्हणजे त्या नॉटरिचेबल आहेत का ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *