तब्बल 604 किलो सोने, किंमत 340 कोटी, सोने तस्करीचा हब बनले मुंबई एअरपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ एप्रिल । देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या सोने तस्करीचा सर्वात मोठा अड्डा बनले आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव गगनाला भिडल्याने सोने स्मगलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. गेल्या अकरा महिन्यात मुंबई विमानतळावरून 604 किलो सोन्याची तस्करी झाली आहे. ज्याची किंमतच 340 कोटी रूपये इतकी आहे. कस्टम विभागानेच ही आकडेवारी जाहीर केली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोने तस्करीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई विमानतळावरून गेल्या अकरा महिन्यात 340 कोटी रूपायांचे 604 किलोग्रॅम सोने तस्करी करताना सापडले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने याबाबतीत दिल्ली विमानतळालाही मागे टाकले आहे. दिल्ली विमानतळावर याच काळात 374 किलोग्रॅम सोने तस्करी करताना सापडले आहे. तर चेन्नई एअरपोर्टवर 306 किलोग्रॅम सोने सापडले आहे. ही सर्व आकडेवारी कस्टम विभागाने जारी केली आहे. मुंबई एअरपोर्टवर गेल्या एप्रिल 2022 पासून फेब्रुवारी 2023 पर्यंत आकडेवारीत वाढ झाली आहे. गोल्ड स्मगलर्ससाठी मुंबई हे खूप मोठे ट्रान्झिस्ट हब बनले आहे, जेथे या महागड्या धातूचे खरेदीदार खूप जास्त आहेत.

कस्टम अधिकाऱ्याच्या मते येथे अनेक सिंडीकेट काम करीत असतात. ज्यात ज्वेलर्स समवेत अनेक लोक सामील असतात. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई देखील सोने तस्कराचे पसंदीचे मार्ग आहेत. हैदराबाद देखील स्मगलिंगचे आकडे किंचित वाढले आहेत. या वर्षी हैदराबाद येथे 124 किलोग्रॅम सोने पकडले गेले. गेल्यावर्षी इकडे 55 किलोग्रॅम सोने सापडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *