एखाद्याची किती बदनामी करायची ! हे बरोबर नाही !!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ एप्रिल । अजित पवार हे नॉट रिचेबल… अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत…अजित पवारांसह 7 आमदार…. अशा बातम्या शुक्रवारी प्रसिद्ध झाल्या आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र आपण 17 तास कुठे होतो, काय करत होतो हे स्वत: अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले आहे. हे सांगत असतानाच त्यांनी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, ‘अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या पाहून मला वाईट वाटलं. हे बंद करा, तुम्ही आधी बातमीची खात्री करा आणि मग ती द्या. कारण नसताना एखाद्याची बदनामी किती करायची?’


17 तास गायब असल्याच्या वृत्तावर अजित पवार यांनी म्हटले की शुक्रवारी कार्यक्रमाला निघालेले असताना त्यांना पित्ताचा त्रास होऊ लागला होता. जागरणे, दौरे यांच्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो असे पवार म्हणाले. जास्त त्रास व्हायला लागल्याने आपण डॉक्टरांकडे गेलो आणि गोळ्या घेऊन झोपलो होतो असे अजित पवार म्हणाले. मधल्या काळात ज्या बातम्या प्रसिद्ध झाला, आज सकाळी वर्तमानपत्रातून ज्या बातम्या पाहायला मिळाल्या त्यामुळे मला वाईट वाटलं असं पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *