महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । IPL 2023 MS Dhoni : आयपीएल 2023 मध्ये 8 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 12 वा सामना खेळला गेला. वानखेडेवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने मुंबईवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
रोहित शर्माच्या संघाने प्रथम खेळताना 8 गडी गमावून 157 धावा केल्या. विजयासाठी दिलेले 158 धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ज संघाने 3 गडी गमावून पूर्ण केले. चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी 13 वाईड आणि तीन नो-बॉल टाकले होते. त्यामुळे कुठेतरी महेंद्रसिंग धोनी नाराज झाला होता. पण दुसरा सामना जिंकल्यानंतर धोनी आनंदी दिसला.
या सामन्याआधी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना महेंद्रसिंग धोनीने आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली होती. खरं तर त्या सामन्यात सीएसकेने वाइड आणि नो बॉलसह अनेक अतिरिक्त धावा दिल्या होत्या. माहीला हे अजिबात आवडले नाही. अशा परिस्थितीत तो सामना संपल्यानंतर म्हणाला होता की, ‘नो बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड बॉल टाकणे टाळावे लागेल. अन्यथा नव्या कर्णधाराखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरी वार्निंग असेल नाहीतर मग मी निघून जाईन.
त्यामुळे गोलंदाजांवर कुठेतरी दडपण आले होते, पण गेल्या सामन्याच्या धोनीच्या इशाऱ्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजाने एकही नो बॉल टाकला नाही आणि फक्त पाच वाईड्स बॉल टाकले.