महाराष्ट्रात 22 जूनपासून मुसळधार पाऊस – हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । 8 जूनपासून महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असून, 22 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत वर्तविला आहे.

पंजाब डख म्हणाले, 9 आणि 10 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. रविवारपासून संगमनेरकडे पाऊस पडणार नसून, तो पाऊस संगमनेरकडून नगर जिल्ह्याकडे पडणार आहे. त्याचबरोबर 10 तारखेपर्यंत राज्यात असेच वातावरण असणार आहे. त्यानंतर 11, 12, 13 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा थोडय़ाफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 13, 14, 15 तारखेला पुन्हा हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर 16, 17, 18 एप्रिलला राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण होणार आहे. त्याचबरोबर मे महिन्यातही दोनदा अवकाळी पाऊस पडणार आहे.

2023 मध्ये हवामान अंदाज देणाऱया काही संस्था आहेत. दुष्काळ पडणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. पण, माझा अंदाज हा वेगळा आहे. मी स्वतः अभ्यास करतो. त्यामुळे माझ्या अंदाजानुसार 2022 प्रमाणेच 2023 मध्येही पाऊस पडणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 8 जूनला राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. तो पाऊस 22 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे. 27, 28 जूनला सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या दिसतील. जूनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्येही जास्त पाऊस येणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *