IPL 2023 : …. ते 4 शब्द अन् रिंकू सिंगने ठोकले 5 षटकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । Rinku Singh IPL 2023 : चांगले तंत्र, लढाऊ आत्मा, हिंमत आणि क्षमता क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी हे सर्व गुण असणे आवश्यक आहे. एखाद्या खेळाडूमध्ये हे गुण असतील तर त्याच्यात चांगली कामगिरी होणे स्वाभाविक आहे.

असे असूनही कधीकधी असे प्रसंगही समोर येतात, जेव्हा तंत्र आणि क्षमता पुरेशी नसते, तर आत्मविश्वासही हवा असतो आणि काही शब्दांचीही. सध्या आयपीएल 2023 ची सर्वात मोठी स्टार रिंकू सिंगच्या बाबतीत फक्त चार शब्द पुरेसे आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवार गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स खेळल्या गेलेला सामना कोणीही कधीही विसरू शकणार नाही. गुजरातच्या 205 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोलकाताला शेवटच्या षटकात 29 धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत रिंकूला स्ट्राईक दिली.

यूपीच्या या 25 वर्षीय फलंदाजाने पुढचे 5 चेंडू सीमारेषेबाहेर पाठवून केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला. आपल्या ऐतिहासिक पराक्रमानंतर रिंकूने सांगितले की, मला स्वत:वर विश्वास आहे पण उमेश यादवच्या बोलण्यानेही त्याला प्रोत्साहन दिले. सामन्यानंतर पुरस्कार सादरीकरणादरम्यान, रिंकूने उमेशचे शब्द आठवले आणि सांगितले की तो फक्त म्हणाला, “लगा रिंकू, सोचियो मत” मग काय रिंकूने यश दयालला पाच षटकार ठोकले.

उमेशबद्दल सांगायचे तर हा सामना त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या खास नव्हता, पण तरीही त्याचे योगदान खूप खास होते. प्रथम उमेशने धावांचा वेग वाढवणाऱ्या शुभमन गिलचा झेल टिपला. उमेशने रिंकूसोबत 21 चेंडूत 52 धावांची नाबाद भागीदारी केली. यामध्ये उमेशने केवळ एक टोक धरून ठेवले नाही तर 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिंकूला स्ट्राईक देऊन आपले काम पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *