दिलासादायक बातमी ; पुणे विभागात एका दिवसात ५००० हुन अधीक रुग्णांनी केली कोरोनावर मात

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरु असताना मात्र, विभागातून दिलासादायक बातमी आहे. पुणे विभागात एका दिवसांत एकूण 5063 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांनी रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9749 आहे. तर अक्टिव्ह रुग्ण 4220 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 216 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 7670 बाधीत रुग्ण असून कोरोनाबाधित 4350 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्ण संख्या 2988 आहे. कोरोनाबाधित एकूण 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

दरम्यान, शनिवारच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 229, सातारा जिल्ह्यात 34, सोलापूर जिल्ह्यात 52, सांगली जिल्ह्यात 9 कोल्हापूर जिल्ह्यात 58 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 516 कोरोना बाधीत रुग्ण असून 158 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्ण संख्या 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 891 कोरोनाबाधीत रुग्ण असून 380 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. रुग्ण संख्या 427 आहे. कोरोनाबाधित एकूण 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 110 रुग्ण असून 57 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्ण संख्या 49 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 562 कोरोना बाधीत रुग्ण असून 118 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्ण संख्या 439 आहे. कोरोना बाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, विभागामध्ये एकूण 87 हजार 951 नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 82544 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5407 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 72680 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 9749 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *