महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित असलेला 8 वा बीआरटी मार्ग नुकताच सुरू केला आहे. बर्याच दिवसांपासून हा मार्ग सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. अखेर हा मार्ग सोमवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
दिघी ते आळंदी बीआरटी (बस रॅपिड ट्रांन्झिस्ट) मार्ग सुरू झाल्यामुळे येथून धावणार्या 27 मार्गांवरील 144 बस या मार्गातून धावतील. त्यामुळे मुख्य रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी कमी होणार असून, प्रवाशांची 5 ते 10 मिनिटे वाचणार आहेत. त्यामुळे या भागात ा प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दिघी ते आळंदी मार्गावर सोमवार
(दि. 11) ची उलाढाल
प बससंख्या – 144
प फेर्या – 1600
प प्रवासी संख्या – 1 लाख
प उत्पन्न – 15 लाख रुपये
पीएमपीकडील एकूण बीआरटी मार्ग…
1) नाशिक फाटा ते वाकड
2) निगडी ते दापोडी
3) सांगवी फाटा ते किवळे
4) संगमवाडी ते विश्रांतवाडी
5) येरवडा ते वाघोली
6) काळेवाडी फाटा ते चिखली
7) स्वारगेट ते कात्रज
8) दिघी ते आळंदी (नव्याने सुरू झालेला मार्ग)
पीएमपीकडील एकूण बीआरटी मार्ग…
1) नाशिक फाटा ते वाकड
2) निगडी ते दापोडी
3) सांगवी फाटा ते किवळे
4) संगमवाडी ते विश्रांतवाडी
5) येरवडा ते वाघोली
6) काळेवाडी फाटा ते चिखली
7) स्वारगेट ते कात्रज
8) दिघी ते आळंदी (नव्याने सुरू झालेला मार्ग)