धान्याचा काळाबाजार करणारे रडारवर; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । पुणे – धान्य दुकानदारांकडून तांदूळ काळ्या बाजारातून विकत घेऊन नंतर तो तांदूळ केडगाव येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना खडक पोलिसांनी छापा टाकून टेम्पो पकडून तिघांना बेड्या ठोकल्या. संशयित आरोपींना स्वस्त धान्य विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

जावेद लालू शेख (35), अब्बास अब्दुल सरकावस (34) आणि इम्रान अब्दुल शेख (30, तिघेही रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश प्रकाश जाधव यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी खडक पोलिसांना अवैधरीत्या स्वस्त धान्य दुकानदारांडून काळ्या बाजारभावाने तांदूळ खरेदी करून या तांदळाच्या गोण्यांनी भरलेला टेम्पो केडगाव येथे विक्रीसाठी निघाला होता.

खडक पोलिसांनी काशेवाडी येथील राजीव गांधी सोसायटी येथे सदर टेम्पो पकडला. या वेळी त्यांच्याकडून मालवाहू टेम्पोसह प्रत्येकी 15 किलोच्या तांदळाच्या 54 पिशव्या असा तब्बल 2 हजार 700 किलो तांदूळ जप्त करण्यात आला. या वेळी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता, हा धान्यसाठा त्यांच्याकडून विक्रीसाठी नेत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता
गरीब नागरिकांच्या वाट्याच्या धान्याची काळ्याबाजाराने स्वस्त धान्य दुकानदारांकडून खरेदी करून हा तांदूळ चढ्या किमतीला विक्रीसाठी चालविल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. त्यांना हे धान्य रेशनिंग दुकानदारांनी कसे विकत दिले. ते दुकानदार कोण आहेत, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, हा काळाबाजार केव्हापासून सुरू होता याचादेखील शोध घेण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *