अंधुक दृष्टी, जीभ सुन्न, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची प्रकृती खालावली?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. कॅन्सरसह अनेक आजारांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीयेत. त्यामुळे डॉक्टरांच्या चिंता वाढल्या आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पुतिन यांना स्पष्ट दिसत नाहीये. तसेच तीव्र डोकेदुखीसह त्यांची जीभही सुन्न झाली आहे. त्यामुळे त्यांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या चिंता वाढल्या आहेत. डॉक्टरांनी सध्या पुतिन यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला माध्यमं त्यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत.

मेट्रो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार ७० वर्षीय रशियाचे अध्यक्ष सातत्याने तीव्र डोकेदुखीची तक्रार करत आहेत. तसेच अधुक दिसतंय. दृष्टीच्या तक्रारीनंतर पुतिन यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे. टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआरच्या हवाल्याने माध्यमांनी दावा केला आहे की, रशियाच्या अध्यक्षांना नव्या उपचारांची आवश्यकता आहे. दरम्यान, रशियात पुतिन यांच्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. त्यांचे हात-पाय सुन्न पडत आहेत. डॉक्टरांनी पुतिन यांना औषधं घेण्यास आणि आराम करण्यास सांगितलं आहे.

https://twitter.com/Gerashchenko_en/status/1626628669476114432?s=20

पुतिन यांच्याकडून डॉक्टरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
रशियाये अध्यक्ष पुतिन यांनी विश्रांती घेण्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं असून ते सतत काम करत आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य अधिक बिघडलं असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. त्यांच्या उजव्या हाताचा आणि पायाचा सुन्नपणा वाढत आहे. मीडिया अहवालांनुसार, पुतिन यांची प्रकृती पूर्वीपेक्षा जास्त खालावली आहे. त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. पुतिन अलिकडच्या काळात खोकला, चक्कर येणे, पोटदुखी आणि झोप न येणं अशा समस्यांशीदेखील झुंजत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *