Simon Doull on Pakistan: “पाकिस्तानात राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे…’ या खेळाडू चा धक्कादायक खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । पाकिस्तान सुपर लीग (PSL)च्या ८व्या मोसमात बाबर आझमवर केलेल्या कॉमेंट्रीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिग्गज समालोचक सायमन डूल यांनी पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवावर मोठा खुलासा केला आहे. सायमनने आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, “पाकिस्तानमध्ये राहणे तुरुंगात राहण्यासारखे होते.” ५३ वर्षीय सायमन डूल सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामात कॉमेंट्री करत आहे. पीएसएलच्या मोसमात पेशावर झाल्मी संघाचे कर्णधार असलेल्या बाबर आझमने एका सामन्यात शतक झळकावले होते, मात्र यादरम्यान त्याने आपले शतक पूर्ण करताना अतिशय संथ फलंदाजी केली आणि सायमन डूलने त्याच्यावर टीका केली. यानंतर पाकिस्तानात राहणे त्याच्यासाठी शिक्षेपेक्षा कमी ठरले नाही.

न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू सायमन डूल आता केवळ समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच त्याने लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या स्ट्राईक रेटवर टीका केली होती. यानंतर त्याचा माजी पाकिस्तानी क्रिकेटर आमिर सोहेलसोबत वाद झाला. पुन्हा एकदा सायमन डूली चर्चेत आहे. यावेळी पुन्हा त्यांनी पाकिस्तानवरच मोठी टीका केली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे आहे. एकदा तो पाकिस्तानात अडकल्यावर त्याला अनेक दिवस उपाशी राहावे लागले.

‘सुदैवाने कसा तरी पाकिस्तानातून बाहेर पडू शकलो’- सायमन
सायमन डूलने सांगितले की बाबर आझमचे चाहते त्याची वाट पाहत होते, त्यामुळे तो मैदानाबाहेर जाऊ शकला नाही. मग त्याने देवाचे आभार मानले आणि सांगितले की कसे तरी त्याने पाकिस्तान सोडले. किवी दिग्गजाने सांगितले की, “त्याला पाकिस्तानमध्ये खूप मानसिक छळ सहन करावा लागला.” न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डोलने पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजला सांगितले की, “पाकिस्तानमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे आहे. मला बाहेर जाऊ दिले नाही कारण बाबर आझमचे चाहते माझी वाट पाहत होते. बरेच दिवस काहीही न खाता मला पाकिस्तानात राहावे लागले. मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होतो. पण देवाचे आभार मानतो की मी कसा तरी पाकिस्तानातून बाहेर पडू शकलो. मी त्याच्यावर टीका केली म्हणून ते चिडले होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *