विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, शालेय शिक्षण जूनपासून सुरू झालेच पाहीजे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत समोर आला. याशिवाय, जूनमध्ये शालेय वर्षही सुर झाले पाहिजे यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. यासंबंधी शालेय शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली त्यात मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार, आ. कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते. 10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले तसेच ते सोडविण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले.

शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची आज बैठक पार पडली. यात शाळा आणि मुलांचे शिक्षण सुरूसाठी अनेक शक्यतांची पडताळणी करण्यात आली आहे. या बैठकी दरम्यान, जून पासून शिक्षण सुरू करावे असे सांगण्यात आले आहे. यात शाळाच सुरू कराव्यात असे नाही. ऑनलाइन , ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू करुन, मुलांचे वर्ष वाया जाऊ देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये

ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल. दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात, असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे असेही यात सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत जूनमध्ये आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश यात देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभाग बैठक महत्त्वाचे मुद्दे

• जून पासून शिक्षण सुरू करावे. शाळा च सुरू कराव्यात असे नाही.

• ऑनलाइन , ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे.

• मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.

• शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये

• ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल

• दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात

• ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे

• जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे.

• कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

• गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी असेही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *