Amarnath Yatra 2023 : ‘या’ दिवशी सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । Amarnath Yatra Date 2023 : केदारनाथ आणि अमरनाथ यात्रा ही प्रत्येक हिंदू भक्ताच्या हृदयात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी भाविक आतुरतेने वाट पाहतात. वर्षातून एकदाच अमरनाथच्या गुहेत प्रवेश करता येतो. भाविकांची अशी मान्यता आहे की, अमरनाथ यात्रा केल्याने आपण पापमुक्त होतो. बर्फाच्छादित पर्वतांच्या मधोमध असलेली नयनरम्य गुहा पाहणे हे अद्भूत अनुभव असतो. दरवर्षी श्रावण्यात ही यात्रा होते.

अमरनाथ यात्रे जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. बाबा अमरनाथच्या गुहेतील स्वयंभू बर्फाळ शिवलिंगाच्या दर्शनासाठी यात्रेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी 1 जुलैपासून ही यात्रा सुरु होणार आहे. तर ही यात्रा 62 दिवस चालणार असून 31 ऑगस्टला संपणार आहे.

कधीपासून नोंदणी होणार सुरु?
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या इच्छुक भाविकांनी ही तारीख नोंद करु घ्या. पुढील आठवड्यातील मंगळवारी 17 एप्रिलपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

दोन्ही मार्गावर करता येणार प्रवास
अमरनाथ यात्रा ही दोन मार्गाने केली जाते. एक अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि दुसरं म्हणजे गंदरबल जिल्ह्यातील बालटाल ट्रॅक…यावेळी या दोन्ही मार्गावरुन प्रवास करता येणार आहे, अशी माहिती नायब राज्यपाल यांनी दिली आहे. त्यामुळे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी अधिकाऱ्यांना दोन्ही ट्रॅकवर उच्च पातळीवरील स्वच्छेतीची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *