महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । एकीकडे राज्यात तापमान वाढत होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे (Pune) शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याकडून पुढील २ दिवस पुण्यात (Pune) येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. (Pune Rain)
‘या’ भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे.
येलो अलर्ट म्हणजे काय?
यलो अलर्ट ही हवामानाबाबत धोक्याची पहिली घंटा आहे. जेव्हा हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला तेव्हा ते तुम्हाला सतर्क राहण्यास सांगतात. अशा परिस्थितीत तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यलो अलर्ट जारी करण्याचा उद्देश लोकांना सतर्क करणे हा आहे. यानुसार, तुम्हाला काळजी घेणे महत्वाचे आहे.