….. जिनं 18 वर्षांपूर्वी शाप दिला होता… अतिक-अशरफ, एक दिवस तुम्हालाही असंच मरण येईल…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । प्रयागराजमध्ये (Prayagraj) 40 वर्षांपासूनची अतिक आणि अशरफची दहशत आता संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय. तीन दिवसातच अतिकचं कुटुंबच नेस्तनाबूत झालं. आधी अतिकचा मुलगा असदचं एनकाउंटर झालं आणि दोन दिवसांनी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री झालेल्या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. मात्र या निमित्ताने 18 वर्षांपूर्वीच्या घटनेचा वारंवार उल्लेख होतोय. अतिकच्या परिवाराला एका महिलेने शाप दिला होता. माझ्या पतीला ज्या प्रमाणे घेरून गोळीबारात ठार केलं, तसाच मृत्यू एक दिवस तुझ्याही वाट्याला येईल… शनिवारी रात्रीच्या घटनेनं या महिलेचा शाप खरा ठरल्याचं म्हटलं जातंय.

कोण आहे ती महिला?

ही 2005 ची घटना आबे. प्रयागराज पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होती. अतिकने त्याचा भाऊ अशरफला निवडणुकीत उतरवलं होतं. अशरफसमोर बसपाचे राजू पाल यांचं आव्हान होतं. राजू पाल यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर लगेच त्यांचं लग्नही झालं. राजू पाल यांचा आनंद पराभूत झालेल्या अतिक अहमद आणि अशरफ यांना सहन होत नव्हता. त्यांनी राजू पालला खतम करण्याचा प्लॅन आखला होता. 25 जानेवारी 2005 रोजी धूमनगंज या ठिकाणी राजू पालला गुंडांनी घेरलं आणि तिथेच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आला. या भीषण हत्याकांडानं प्रयागराज हादरलं होतं. पूजा पाल यांच्या हातावरची मेंदीनी निघाली नव्हती.. लग्नाच्या नवव्या दिवशीच तिच्या पतीची खुलेआम हत्या करण्यात आली.

त्याच दिवशी पूजा पालने अतिक आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला होता. अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं फळ त्यांना देईल. 18 वर्षानंतर शनिवारी रात्री घडलेली घटना त्याच शापामुळे घडली की काय, असं म्हटलं जातंय.

तीनच दिवसात अतिकचं संपूर्ण कुटुंब उद्धव स्त झालं. त्याचे दोन अल्पवयीन मुलं तुरुंगात आहेत. तर पत्नी शाइस्ता फरार आहे. असद आणि अतिक रुटीन चेकअपसाठी जात असताना काही सेकंदातच गो्ळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

अतिक आणि अशरफ यांच्या मृत्यूनंतर पूजा पाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘जैसा करता है वैसाही भरता है.. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते.. माणसाच्या कर्माचं फळ इथेच भोगून जावं लागतं…’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *