महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । वय वाढत जातं तसतशी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण विशिष्ट वयानंतर शरीरात बरेच बदल होतात. विशेषत: पुरुषांमधे तिशीनंतर पोषक तत्व संतुलित राहावे यासाठी त्यांनी पौष्टिक आहार घेणे फार महत्वाचे आहे. नाहीतर वाढत्या वयात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
30 वर्ष उलटलेल्या तरुणांनी त्यांचा डाएट सर्वप्रथम ठरवणे फार आवश्यक आहे. तसेच काही पदार्थांबाबत सावध राहाणेही गरजेचे आहे. तेव्हा तुमच्या डाएटमधे काय असावे आणि काय नाही ते जाणून घेऊया.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमधे उदा. पालक, काळे आणि कोलार्ड व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते. हे मिनरल्स पुरुषांना वाढत्या वयात हेल्दी ठेवतात. पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्सयुक्त असतात. हे अँटिऑक्सिडंट्स हृदयरोग आणि कँसरचा धोका कमी करतात.
बेरीज (Berries)
पुरुषांच्या डाएटमधे बेरीज असाव्यात. यामधे कमी कॅलरीज आणि हाय अँटिऑक्सिडंट्स असतात.ज्याने शरीरावरी सूजन कमी होते आणि वेगवेगळ्या आजारांपासून तुम्ही दूर राहाता.
नट्स
नट्स हेल्दी असतात. नट्स फायबर आणि प्रोटिनचा मोठा सोर्स आहे. तसेच नट्स फायबर, व्हिटामिन आणि मिनरल्सयुक्त असतात. ज्यामुळे तुमचा इम्यून पावर वाढतो. आणि आजारांचा धोका कमी होतो.
कडधान्य
ब्राउन राइस, क्विनोआ आणि गव्हाच्या चपात्या यात बऱ्या प्रमाणात फायबर असते. पोषक तत्वांचा हा मोठा सोर्स आहे. यामुळे तुमची पाचन व्यवस्था सुधारते. तेव्हा पुरुषांनी तिशीनंतर या सगळ्या गोष्टी त्यांच्या डाएटमधे अॅड कराव्यात. (Diet Plan)
आरोग्यवर्धक गोष्टी खाल्ल्याने केवळ तुमची इम्युनिटीच स्ट्राँग होत नाह तर शरीरातील वेगवेगळ्या पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. तेव्हा केवळ पुरुषांनीच नाही तर प्रत्येकाने त्यांचा डाएट सुरुवातीपासूनच हेल्दी ठेवणे गरजेचे ठरते.