महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । अमरनाथ यात्रेसाठी सोमवारपासून नोंदणी सुरू झाली. द. काश्मीरच्या हिमालय क्षेत्रात ३,८८० मीटर उंचीवरील पवित्र गुहेत शिवलिंगाच्या दर्शनासाठी ही तीर्थयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. या वर्षी यात्रा ६२ दिवसांपर्यंत राहील. १३ ते ७० वयापर्यंतचे लोक नोंदणी करू शकतात. ६ आठवडे वा त्यापेक्षा जास्त गरोदर महिलांना परवानगी नाही.
देशाच्या ३१ बँकांत होऊ शकेल बेस्ड रजिस्ट्रेशन, यात्रेचा मार्गही सांगावा लागेल
अशी करा नोंदणी : ऑफलाइन नोंदणी देशभरातील ३१ बँकांच्या ५४२ शाखांवर होईल. ऑनलाइन नोंदणी अमरनाथ यात्रेची अधिकृत वेबसाइटद्वारे करू शकाल. या वेळी आधार बेस्ड नोंदणी होईल. या अंतर्गत यात्रेकरूच्या अंगठ्याचे स्कॅन घेतले जाईल.
नोंदणी शुल्क : ऑफलाइन नोंदणीसाठी प्रति व्यक्ती १२० रु. आणि ऑनलाइन नोंदणीसाठी २२० रु. द्यावे लागतील. ग्रुप नोंदणीसाठी प्रति व्यक्ती २२० रु. शुल्क लागेल. एनआरआयसाठी नोंदणी शुल्क १,५२० रु. आहे.
आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील : आवश्यक कागदपत्राविना नोंदणी होणार नाही. पासपोर्ट आकाराचा फोटो, आयडी प्रुफची प्रत आणि मेडिकल प्रमाणपत्र द्यावे लागेल. यात्रेची तारीख व मार्गही सांगावा लागेल.
१ जुलैपासून यात्रा सुरू : यात्रा १ जुलैपासून सरू होऊन ३१ ऑगस्टला समाप्त होईल. यात्रा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्गावरून आणि गांदरबल जिल्ह्यातीच्या बालटालहून एकाच वेळी सुरू होईल. पहलगामहून यात्रा मार्ग ४६-४८ किमी लांब आहे. येथून यात्रेला ५ दिवस लागतात. बालटालहून गुहेचे अंतर १४-१६ किमी आहे. खड्या रस्त्यामुळे येथून सर्वांना जाणे शक्य नाही.
यात्रेकरूंसाठी सुविधा : यात्रेकरूंसाठी निवास, पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था केली आहे. अॅपद्वारे हवामानाची माहिती दिली जाईल.
अशी घ्या काळजी
आरोग्याची काळजी घ्या. यात्रेच्या एक महिना आधी रोज ४-५ किमी चाला किंवा ३० मिनिटांपर्यंत जॉगिंग करा. श्वसनाचे योग करा. उबदार कपडे, छत्री, टॉर्च, वॉटरप्रुफ ट्रेकिंग शूज, रेनकोट सोबत न्या. पाण्याची बाटली, ड्राय फ्रूट्स, ग्लुकोज बिस्किट, गुळ, डार्क चॉकलेट आदी आवश्य ठेवा. गुहेच्या छतात एक भेग असून त्यातून पाणी टपकते आणि त्यातूनच हे शिवलिंग तयार होते. त्यामुळे यास बाबा बर्फानीही म्हटले जाते.